Mango Custard Recipe: उन्हाळ्यातील थंड गोडवा! मँगो कस्टर्ड तयार करण्याची सोपी आणि झटपट पद्धत

Dhanshri Shintre

अप्रतिम डेझर्ट

आज आपण एक अप्रतिम डेझर्ट तयार करणार आहोत, जे उन्हाळ्यासाठी एकदम परिपूर्ण आणि स्वादिष्ट कस्टर्ड ठरणार आहे.

मँगो कस्टर्ड

उन्हाळ्यात लहान मुलांना आवडणारे हे मँगो कस्टर्ड फारच स्वादिष्ट लागते. चला तर मग त्याची रेसिपी पाहुया.

साहित्य

२ कप दूध, २ टेबलस्पून कस्टर्ड पावडर (व्हॅनिला फ्लेवर), २-३ टेबलस्पून साखर (चवीनुसार), १ मोठा आंबा (पिकलेला) - सोलून कापलेला किंवा प्युरी केलेला, थोडेसे सुके मेवे सजावटीसाठी

कृती

प्रथम थोडक्यात थंड दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर चांगली मिसळा. गुठळ्या राहू देऊ नका.

दूध गरम करा

उरलेले दूध गॅसवर गरम करायला ठेवा. उकळी आली की त्यात साखर घाला.

कस्टर्ड घाला

मग त्यात हळूहळू तयार केलेले कस्टर्ड मिश्रण घाला आणि सतत ढवळत राहा.

थंड करायला ठेवा

मिश्रण गडद होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.

आंब्याची प्युरी

नंतर त्यात आंब्याची प्युरी किंवा बारीक तुकडे मिसळा. थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा.

सर्व्ह करा

थंड झाल्यावर वरून सुके मेवे घालून सर्व्ह करा.

NEXT: फक्त काही मिनिटांत बनवा झटपट मसालेदार बेसन चिल्ला, नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय

येथे क्लिक करा