Rohini Gudaghe
तेल लावून वांगी भाजुन घ्या.
भाजल्यानंतर वांग्याची साल काढा.
फोडणीसाठी कढई गरम करा आणि तेल घाला.
तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं, कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, घाला.
कांद्याला हलका सोनेरी रंग आल्यानंतर त्यात आलं लसणाचा ठेचा, गरम मसाला, हळद, धणे पूड घाला.
चांगलं परतल्यानंतर त्यात सोललेलं वांगं घालून मिक्स करा.
त्यात शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ घालून पुन्हा चांगलं हलवू घ्या.
बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पसरवा. तुमचं वांग्याचं भरीत खाण्यासाठी रेडी.