Rohini Gudaghe
चकली बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा धुवून रात्रभर भिजत ठेवावा.
बटाटे उकडा आणि बारीक किसनीने किसून घ्या.
आता एका भांड्यात १ ते २ कप पाणी आणि मीठ घालून गरम करा.
त्यात भिजवलेला साबुदाणा घालून मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा.
हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. त्यात किसलेले बटाटे घाला.
मसाले टाका
तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिसळा.
चकलीच्या साच्याला तेल लावून ग्रीस करा. बनलेलं मिश्रण त्यात घाला.
तेल लावलेल्या प्लास्टिकच्या कागदावर चकलीला हवा तो आकार द्या.
चकली कडक उन्हात वाळवा.तुमची चकली तयार आहे.