Manasvi Choudhary
स्वयंपाक करताना अशा अनेक छोट्या- छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण बनवायला वेळ लागतो.
परंतु, आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत जे तुमचा वेळ नक्की वाचवतील.
जेवण बनवताना तुमचे संपूर्ण लक्षण पदार्थ बनवण्यावर असावे. एकावेळी एकच काम करणे महत्वाचे.
स्वयंपाक बनवण्यासाठी जी भांडी लागणार आहेत ती सर्व आधीच काढून, स्वच्छ धुवून ठेवा.
भाजी कापताना धारदार चाकूचा वापर करा. जेणेकरून भाजी लवकर कापली जाईल आणि वेळ वाचेल.
स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य बाहेर काढून ठेवा म्हणजे वेळ कमी लागेल.
प्रेशर कुकरमध्ये भाज्या किंवा भात शिजवल्याने अन्न लवकर शिजते आणि गॅसचीही बचत होते.