ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खाण्या-पिण्याच्या वस्तू, औषधे तसेच स्किन केअर प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेट असते. याचप्रमाणे आपल्या किचनमध्ये वापरली जाणारी भांडी आणि वस्तूंचीही एक्सपायरी डेट असते. हे तुम्हाला माहीत आहे का?
आपल्या किचनमध्ये काही भांडी अशी असतात, जी वर्षानुवर्षे वापरली जातात. अगदी १०-१० वर्षे एकाच कढईत, टोपात जेवण बनवलं जातं. पण असे करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.
आर्टेमिस हॉस्पिटलमधील डर्मेटोलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. पूजा अग्रवाल यांच्या मते, भांडी आणि वस्तू वापराची मुदत संपल्यानंतर ते तसंच वापरात आणणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे भांडी वेळेत बदलणे आवश्यक आहे.
कालांतराने भांड्यांची झीज होते. त्यांची गुणवत्ता खराब होते आणि त्यात पदार्थ तयार करणं धोकादायक होतं.
तुटलेल्या भांड्यांच्या भेगांमध्ये किंवा जीर्ण भागांवर किटाणू होऊ शकतात. त्यामध्ये बनवलेले अन्न दूषित होते.
भांडी घासायचा स्क्रबर दर २-४ आठवड्यांनी किंवा जर त्यांना वास येऊ लागला, तुटू लागला तर लवकर बदला.
१-२ वर्षांनी सोलणीच्या ब्लेडची धार गेल्यास किंवा हँडल सैल झाल्यास ते त्वरीत बदला.
अन्न साठवण्याचा प्लास्टिक कंटेनर १-३ वर्षांनी बदला. कारण ठराविक काळानंतर प्लास्टिकमधून आरोग्यास घातक असलेला रेजीन हा विषारी पदार्थ रीलीज होण्यास सुरूवात होते. जो अन्नामध्ये मिसळू शकतो.
सिलिकॉन स्पॅच्युलाच्या कडा काही काळाने वितळतात, मऊ होतात. त्यामुळे ते वितळू लागल्यास किंवा २-३ वर्षांनी बदलायला हवे.