ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक घरात चहामध्ये, मसाल्यामध्ये तसेच जेवणानंतर मुखवास म्हणून वेलची वापरली जाते.
मसाल्यासह गोड पदार्थ आणखी चविष्ट आणि सुंगंधित बनवण्यासाठी वेलची वापरली जाते. पदार्थांची चव वाढवणाऱ्या या वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
जेवणानंतर वेलची खाल्ल्याने पचन चांगले होते. तसेच एका विशिष्ट प्रकारे तिचे सेवन केल्यास वजनही कमी होते.
अपचनासह ,सूज आणि श्वासासंबंधीच्या समस्यांवर देखील वेलची खुपच परिणामकारक आहे.
याशिवाय वेलचीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
वेलचीच्या बियांमधील अर्क तोंडातील अनेक प्रकारचे बॅक्टेरिया मारतो. त्यामुळे हे विशेषत: हिरड्यांच्या आजारांसाठी अधिक फायदेशीर ठरते.
वेलचीचे नियमित सेवन हृदयविकार, कर्करोग आणि इतर जुनाट आजारांचा धोका कमी करतं.
वेलचीमध्ये असलेले घटक मूड स्विंग्स कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे स्रियांनी मासिक पाळीच्या दरम्यान वेलची खाल्ल्यास उपयुक्त ठरते.
तुम्ही वेलचीचे सेवन कसेही करू शकता. पण रोज सकाळी वेलचीचे ४-५ दाणे गरम पाण्यात उकळवून ते पाणि प्या. यामुळे पचनाची क्षमता दुप्पट होईल आणि वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल.