Siddhi Hande
गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेवर सुंदरच दिसतो. गुलाबी रंगाच्या साडीत महिलेचं सौंदर्य अजूनच खुलतं.
गुलाबी रंगाच्या साडीवर तुम्ही जर कॉन्ट्रास्ट रंगाचा नेकलेस घातला तर तो खूपच शोभून दिसेल.
तुम्ही पिंक साडीवर एकतर गुलाबी रंगाचा मॅचिंग नेकलेस घालू शकतात. हा लूकदेखील छान दिसेल.
गुलाबी आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. तुम्ही जर पिंक कलरची कांचीवरम किंवा प्लेन साडी नेसली असेल तर त्यावर हिरव्या रंगाचा हार घाला.
गुलाबी रंगाच्या काठपदर साडीवर गोल्डन रंगाचा नेकलेस एकदम परफेक्ट दिसेल. त्यावर मॅचिंग झुमके घाला.
गुलाबी रंगाच्या कोणत्याही साडीवर मोत्याचा हार खूप शोभून दिसेल. बारीक डिझाइन असलेला हार घातल्यावर लूक अजूनच क्लासी आणि स्टायलिश दिसेल.
तुम्ही पिंक साडीवर गळ्यात चोकर घालू शकतात. चोकर घातल्यावर गळा भरलेला दिसतो.
तुम्ही डायमंडचा नेकलेस परिधान करु शकतात.डायमंडचा नेकलेस प्रत्येक लूकवर शोभून दिसेल. वेस्टर्न साडीवर हा नेकलेस नक्की ट्राय करा.