Kidney Failure: रिकाम्या पोटी पेनकिलर घेतल्याने किडनी निकामी होते? जाणून घ्या सत्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रिकाम्या पोटी पेनकिलर गोळ्या घेणे

रिकाम्या पोटी पेनकिलर गोळ्या घेतल्याने पोटालाच नुकसान होत नाही तर,किडमी निकामी देखील होऊ शकते.

Kidney | Ai gemerator

पेनकिलर औषधे

पेनकिलर औषधे शरीरातील वेदना आणि सूज कमी करतात. ते किडनीमध्ये रक्त प्रवाह कमी करू शकतात, ज्यामुळे किडनीवर दबाव येतो.

kidney | canva

रिकाम्या पोटी पेनकिलर खाणे

रिकाम्या पोटी पेनकिलर गोळ्या घेतल्याने पोटातील अॅसिड वाढते. पोटाच्या आतील आवरणाला नुकसान होते. तसेच, त्याचा थेट परिणाम रक्तदाब आणि किडनीवर होतो.

kidney | yandex

किडनीवर परिणाम

सतत पेनकिलर औषध घेतल्याने किडनीच्या फिल्टर सिस्टमला नुकसान होते. तसेच, क्रिएटिनिन आणि युरियाची पातळी वाढते. तसेच हळूहळू दीर्घकालीन किडनीच्या आजाराचा धोका देखील वाढतो.

Kidney | Saam Tv

कोणत्या लोकांना जास्त धोका आहे?

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण, वृद्ध तसेच ज्यांना आधीच किडनीचा त्रास आहे,आणि जे वारंवार किंवा दररोज पेनकिलर औषधे घेतात त्यांना किडनी निकामी होण्याचा जास्त धोका असतो.

kidney | yandex

कशी काळजी घ्याल

रिकाम्या पोटी कधीही पेनकिलर गोळ्या घेऊ नका.तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेनकिलर गोळ्या घेऊ नका आणि वेळोवेळी किडनी फंक्शन टेस्ट करा.

Kidney | yandex

डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्हाला यापैकी कोणताही लक्षणे दिसली तर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

kidney | yandex

NEXT: किचनमधील 'या' गोष्टीमुळे होतो वास्तुदोष, घरात वाढते नकारात्मक उर्जा

kitchen | yandex
येथे क्लिक करा