ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच अनेक संसर्गाच्या आजारांचा धोका वाढतो.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात प्रोटीन, फायबर सारख्या घटकांचा समावेश केला पाहिजेल.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात विशेष वनस्पतींचा समावेश करा.
गुळवेल ही औषधीय वनस्पती मानली जाते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी गुळवेल पावडर मिसळून प्यायल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पावसाळ्यात मुलेठीचे सेवन लाभदायक ठरते. त्यामधील अँटीव्हायरल गुणधर्म शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते.
तुळस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते त्यामधील टी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टीरियल गुणधर्म रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.