ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला बद्धकोष्ठतेचा जास्त त्रास असेल तर तुम्ही काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यात आता बाहेरच्या पदार्थांचा समावेश जास्त प्रमाणात आहे.
बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या समस्या जाणवतात. त्यात बद्धकोष्ठता ही सगळ्यात मोठी समस्या आहे.
बद्धकोष्ठता आणि गॅस या समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल तर, तुम्ही पुढील उपाय करु शकता.
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास तु्म्ही काळे मनुके खावू शकता. त्यात साखर, फायबर आणि व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते.
तुमचे पोट साफ होत नसेल तर रोज झोपताना ५ ते ६ मनुके खावू शकता.
मनुका खाण्यापुर्वी तुम्ही ते भिजत ठेवा. मनुके खाल्यावर तुम्ही पाणी पिऊ शकता. त्याने गॅसची समस्या दूर होवू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: दिवाळीला घरात लक्ष्मीची पावले कुठे लावावीत?