Protein Breakfast Recipe: सतत भूक लागतेय? मग नाश्त्यात करा या 4 पदार्थांचा समावेश, सततची भूक होईल गायब

Sakshi Sunil Jadhav

सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता तुम्ही पोटभर केलात तर दिवसभर तुम्हाला छोटी छोटी भूक लागणं बंद होतं. त्याने तुमचा फॅटही कमी होतो असं तज्ज्ञ सांगतात.

Healthy Breakfast Foods

बेसन चिल्ला

बेसन चिल्ला हा हरभऱ्याच्या पीठापासून बनवला जातो. त्यामुळे त्यामध्ये असणारे वनस्पतीजन्य प्रोटीन तुम्हाला मिळते. त्यात पालक, कांदा किंवा शिमला मिरची घातल्याने फायबरही वाढतं.

weight loss breakfast

मिक्स स्प्राउट्स

मिक्स स्प्राउट्स सॅलडमध्ये मुग, हरभरे, वाटाणे यांचे मोड आलेले धान्य असतात, जे प्रोटीन, फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वांनी भरपूर असतात. लिंबाचा रस आणि थोडे चाट मसाला घातल्याने स्प्राउट्सची सॅलड चविष्ट आणि पौष्टिक बनतं.

foods to reduce hunger

व्हेज उपमा

व्हेज उपमा हा जरी कार्बोहायड्रेट्सने भरलेला असला, तरी त्यात भाजलेले शेंगदाणे घातल्यास प्रोटीनचे प्रमाण वाढते. शेंगदाण्यांमुळे उपमाला चव तर मिळतेच, पण नाश्ता जास्त संतुलित आणि पोटभरही बनतो.

foods to reduce hunger

घट्ट दही

ग्रीक योगर्ट किंवा घट्ट दही हे उच्च प्रतीच्या प्रोटीनचे उत्तम स्रोत मानले जातात.

morning diet tips

सोपी ट्रीक

तुम्ही त्यावर बदाम, अक्रोड आणि बिया (सीड्स) घातल्या की हेल्दी फॅट्सही मिळतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

morning diet tips

हेल्दी नाश्त्याचा फायदा

तुम्ही हा प्रोटीनयुक्त नाश्ता केल्यात तर तुमचं वजन नियंत्रणात राहील, स्नायू बळकट होतील आणि दिवसभर भूक नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

morning diet tips

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

morning diet tips

NEXT: बायकोला द्या मंगळसुत्राच्या या डिझाईन्सच्या भेट वस्तू, व्हेलेंटाईन होईल खास

trendy mangalsutra
येथे क्लिक करा