ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डोकं दुखणे ही सामान्य गोष्ट आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे डोक दुखण्याची समस्या होऊ शकते.
पण अनेकदा ही समस्या गंभीर असू शकते.
चला तर जाणून घेऊया डोकं दुखण्यामागचे कारण कोणते आहेत.
स्ट्रेस, मायग्रेन, सायनस आणि अॅसिड रिफ्लेक्स किंवा झोप न झाल्यामुळ देखील डोकं दुखते.
बहुतांश लोकांना मायग्रेनचा त्रास होतो. कमी वयातच हा त्रास त्यांना जाणवू लागतो.
मायग्रेनमध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात सतत डोकं दुखण्याचा त्रास होतो. आणि हा त्रास वाढत जातो.
ताणतणावामुळे देखील डोकं दुखीचा त्रास वाढू शकतो. म्हणून शक्य तेवढे ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
झोप पूर्ण न झाल्यामुळे डोकं दुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: रोजच्या आहारात 'हे' पदार्थ खाणं गरोदर महिलांना ठरेल फायद्याचं