Chetan Bodke
घरामध्ये साफसफाई ठेवणे खूप गरजेचे आहे. स्वच्छ वातावरणासाठी घराची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.
अनेकदा आपण घरातील विजेच्या वस्तू साफ करतो. पण त्याच वस्तू साफ करणे आपल्यासाठी खूप कठीण काम होऊन बसते.
विशेषत: टीव्ही साफ करणे आपल्यासाठी खूप मोठं टास्क असतं, कारण आपल्या एका चुकीने स्क्रीनला क्रॅक जाऊ शकते.
टीव्हीची स्क्रीन फार नाजूक असते. टिव्ही स्क्रिन साफ करताना काळजी घेणं महत्वाचे असते. छोट्याशा चुकीमुळे टीव्हीचे मोठे नुकसान होऊ शकते.
स्क्रिन जोरात पुसल्यामुळे स्क्रीनला क्रॅक किंवा खराब होऊ शकते. त्यामुळे टिव्ही स्क्रिन हलक्या हातांनी आणि स्वच्छ कपड्याने पुसावी.
टिव्ही स्क्रिन काही ठराविक अंतराने स्वच्छ करत राहा. वारंवार पुसल्याने ब्राइटनेसवर मोठ्या प्रमाणावर फरक जाणवू शकतो.
टिव्ही स्क्रिन साफ करताना कोणत्याही क्लिनिंग सोल्युशनची फवारणी करू नका.
टिव्ही स्क्रिन साफ करताना, टिश्यु पेपर किंवा टॉवेलचा वापर करावा.
स्क्रिन साफ करण्यासाठी जे लिक्विड वापरणार आहेत ते कापडावर फवारून घेत त्याची साफसफाई करावी.
अमोनिया, अल्कोहोल किंवा एसीटोन असलेले लिक्विड वापरू नये. कारण ते टीव्ही प्रॉडक्ट्सवर हानी पोहोचवू शकतात.