Sakshi Sunil Jadhav
अलीकडच्या संशोधनानुसार भारतातील ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये कोलन कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे.
पोटदुखी, अचानक वजन कमी होणे, रक्तस्राव, सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
फास्ट फूड, जास्त तेलकट आहार, फायबरची कमतरता आणि बसून राहण्याची सवय ही महत्त्वाची कारणे मानली जातात.
कुटुंबातील कोणाला कोलन कॅन्सर असल्यास पुढील पिढीत हा धोका जास्त असतो.
धूम्रपान, मद्यपान आणि वाढलेले वजन यामुळे या आजाराचा धोका दुप्पट होतो.
कोलन कॅन्सर तपासण्यासाठी कोलोनोस्कोपी आणि स्टूल टेस्ट प्रभावी मानल्या जातात.
वय ३० नंतर पचनाशी संबंधित त्रास सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.