Manasvi Choudhary
कॉलेजसाठी मुलींना युनिक फॅशन करायला आवडते. जड दागिने घालायला मुलींना आवडत नाही.
दिसायला नाजूक आणि स्टायलिश अशी ज्वेलरी आजकाल मुली घालतात. जी वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही लूकवर उठून दिसते.
तुम्ही जर डिपनेक टॉप किंवा टि- शर्ट घातला असेल तर तुम्ही दोन किंवा तीन लेयर्ड असलेल्या गोल्डन किंवा सिल्वर चैन घालू शकता.
हाताच्या बोटांमध्ये अत्यंत नाजूक अश्या दोन ते तीन अंगठ्या घालण्याचा सध्या ट्रेंड आहे. हार्ट किंवा इनफ्निटी या चिन्हांच्या तुम्ही अंगठ्या घालू शकता.
साध्या कुर्तीवर मोठे चांदबाली किंवा छोटे 'झुमके' तुम्ही घालू शकता हा एक युनिक स्टेटमेंट लूक दिसेल
आजकाल घड्याळसोबत ब्रेसलेट घालण्याचा ट्रेंड आहे. साखळी किंवा गोल्ड- सिल्वर डिझाईनचा कडा देखील तुम्ही घालू शकता.
डिझायनर वेगवेगळ्या शेप्सचे हूप्स म्हणजेच एअररिंग्स अत्यंत भारी दिसतात. ज्यामध्ये तुम्ही छोटे मणी, फुले, गोल, आयताकृती अशा शेप्स निवडू शकता.
तुमच्या आऊटफिटला मॅचिंग दागिने निवडा. सिल्व्हर ज्वेलरी पेस्टल कलर्सवर छान दिसते, तर गोल्ड ज्वेलरी गडद रंगांवर उठून दिसते.