Siddhi Hande
पाणीपुरी हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. गरम रगडा असलेली पाणीपुरी तर सर्वांनीच खाल्ली असेल.
तुम्ही कधी थंड पाणीपुरी खाल्ली आहे का? थंड पाणीपुरी ही चवीला खूप चटपटीत आणि स्वादिष्ट असते.
तिखट पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदीना, हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात थोडं पाणी टाका.
यानंतर एका भांड्यात हे मिश्रण गाळून घ्या. त्यात चाट मसाला आणि मीठ टाका.
गोड पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम चिंच आणि खजूर भिजत ठेवा.
यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करा. तेदेखील गाळून घ्या. त्यात थोडं पाणी टाका.
हे दोन्ही पाणी मिक्स करा. त्यात बर्फाचा तुकडा टाकून ठेवा.
यानंतर पाणीपुरीच्या पुरीत खारट बुंदी टाका.
या पुऱ्यांमध्ये आता तुम्ही मिक्स केलेलं पाणी टाका. मस्त शेव टाका.
ही थंड पाणीपुरी आता तुम्ही खाऊ शकतात. ही पाणीपुरी चवीला खूप मस्त असते.