Manasvi Choudhary
इडली, मेदूवडा स्पेशल सांबर खायला सर्वांनाच आवडतो.
सांबर बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सांबर बनवण्यासाठी तूरडाळ, वांगी, लाल भोपळा, बटाटा, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कढीपत्ता. मेथी दाणे, राई, हिंग, हळद, लाल मसाला, सांबर मसाला, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
प्रथम तूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या नंतर कुकरला शिजवून घ्या.
वांगी, लाल भोपळा, बटाटा, टोमॅटो भाज्या बारीक चिरून घ्या. शेवग्याच्या शेंगा सोलून घ्या.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मेथी दाणे, राई, कढीपत्ता घालून छान फोडणी द्या.
नंतर या मिश्रणात हिंग घाला आणि चिरलेल्या भाज्या चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण छान मिक्स करा.
आवश्यकतेुसार पाणी घालून मिश्रण शिजवून घ्या.
यानंतर मिश्रणात शिजवलेली तूर डाळ घाला डाळ आधी छान घोटून घ्या,आता या मध्ये सगळे मसाले घालून एकजीव करून घ्या.
अशाप्रकारे साऊथ इंडियन स्टाईल सांबर सर्व्हसाठी तयार आहे.