Shreya Maskar
कोल्ड कॉफी बनवण्यासाठी कॉफी पावडर, दूध, पाणी, साखर, बर्फाचे तुकडे आणि चॉकलेट सिरप इत्यादी साहित्य लागते.
कोल्ड कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम पाण्यात कॉफी फेटून घ्या.
ब्लेंडर जारमध्ये फेटलेली कॉफी, दूध, साखर आणि बर्फाचे तुकडे टाकून ब्लेंड करा.
कॉफी छान ब्लेंड झाल्यावर त्यात चॉकलेट सिरप टाका.
आता ग्लासमध्ये कॉफी टाकून बर्फाचे तुकडे त्यात टाका.
वरून चॉकलेट पावडर टाकायला विसरू नका.
कोल्ड कॉफीची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात आईस्क्रीम देखील टाकू शकता.
अशाप्रकारे कूल कूल कोल्ड कॉफी तयार झाली आहे.