Shreya Maskar
सणासुदीला प्रत्येकाला छान, सुंदर दिसायचे असते. त्यामुळे चेहऱ्यावर आवर्जून घरगुती कॉफी फेसपॅक लावा. यामुळे त्वचा मिनिटांत ग्लो करते.
कॉफी फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या आठवड्याभरात जाण्यास मदत करतात. तसेच चेहरा चमकदार होतो.
कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, एक्सफोलिएटिंग हे गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते. त्वचेचा रंग उजळतो आणि पिंपल्सचे डाग कमी होतात.
कॉफी फेसपॅक कोरड्या त्वचेसाठी रामबाण उपाय आहे. कॉफी फेसपॅक कसा बनवावा, जाणून घेऊयात.
कॉफी फेसपॅक बनवण्यासाठी दही, कॉफी पावडर आणि गुलाबपाणी इत्यादी साहित्य लागते. फक्त तीन पदार्थांमधून तुमची त्वचा हेल्दी होते.
कॉफी फेसपॅक बनवण्यासाठी बाऊलमध्ये कॉफी पावडर, दही आणि गुलाबपाणी मिक्स करून चांगली पेस्ट बनवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता.
तयार फेस पॅक चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने लावून घ्या. त्यानंतर १० मिनिटे चेहऱ्याला चांगला मसाज करा. म्हणजे त्वचेला पोषण मिळेल.
१५-२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर मॉइस्चराइजर लावा.