ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगभरात कॅाफीचे सेवन केले जाते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॅाफीपासूनच होते.
अधिक प्रमाणात कॅाफी पिणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. हे आपल्याला माहित आहे.
परंतु काही लोकांनी कॅाफीचे सेवन करु नये अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
ज्या लोकांना झोपेची समस्या, मानसित तणाव आणि अग्झांयटी असेल त्यांनी कॅाफी पिणे टाळावे.
हृदयाशी संबधित समस्या असल्यास किंवा उच्चक्तदाबाची समस्या असल्यास कॅाफीचे सेवन करु नये.
ज्या व्यक्तींना पचनाची समस्या जसे की अपचन, अॅसिडीटी आहे त्यांनी कॅाफी पिणे टाळावे.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त प्रमाणात कॅाफीचे सेवन करु नये. कॅाफीमध्ये कॅफीन असते ज्याचा बाळावर परिणाम होतो.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या नसेल तर दिवसातून एक ते दोन कप कॅाफी पिऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: नो ओवन नो टेन्शन! आता घरीच कुकरमध्ये बनवा टेस्टी केक