Shruti Vilas Kadam
नारळपाण्यात व्हिटामिन C असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत करते.
यामध्ये व्हिटामिन B1, B2, B3 आणि B6 असतात, जे शरीरातील ऊर्जा वाढवतात आणि थकवा कमी करतात.
नारळपाण्यात पोटॅशियम जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि स्नायू मजबूत करते.
हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यात असतात.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नारळपाणी अत्यंत उपयुक्त ठरते.
नारळपाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि पचन सुधारते.
यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा ग्लोइंग ठेवतात आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करतात.