ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नारळ पाणीला नॅचरल एनर्जी ड्रिंक म्हटले जाते. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला एनर्जी आणि पोषण मिळते, तसेच शरीर हायड्रेट देखील राहते.
आरोग्य तज्ञांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहित आहे का की, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नारळ पाणी सर्वांसाठी फायदेशीर नाही?,जाणून घ्या.
नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनीच्या आजारात शरीर हे बाहेर टाकू शकत नाही ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. म्हणून किडनी रुग्णांनी नारळ पाणी टाळावे.
नारळ पाणी ब्लड प्रेशर कमी करते. ब्लड प्रेशरच्या औषधांसोबत नारळ पाणी प्यायले तर ब्लड प्रेशर खूप कमी होऊ शकतो, ज्यामुळे चक्कर येणे किंवा थकवा येऊ शकतो.
नारळ पाणीमध्ये नैसर्गिक साखर असते. जास्त प्रमाणात प्यायल्याने ब्लड शुगर वाढू शकते, म्हणून कमी प्रमाणात प्या.
ज्यांना ड्राय फ्रुट्ची अॅलर्जी असते त्यांना नारळ पाणी अॅलर्जी देखील असू शकते म्हणून नारळ पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर तुम्ही खेळाडू किंवा इन्टेंस व्यायाम करत असाल तर नारळ पाणी पिऊ नका. नारळ पाणीमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते म्हणून याऐवजी स्पोर्ट्स ड्रिंकचे सेवन करा.