Shruti Vilas Kadam
हिवाळ्यात तहान कमी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. नारळ पाणी शरीराला नैसर्गिक हायड्रेशन देते.
नारळ पाणी पिल्याने अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटफुगी यासारख्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
नारळ पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात, जे हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतात.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. नारळ पाणी नियमित प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेट राहते.
नारळ पाणी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते, त्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
नारळ पाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ऊर्जा देतात आणि हिवाळ्यात येणारा सुस्तीपणा कमी करतात.
कमी कॅलरी असलेले नारळ पाणी पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते.