Manasvi Choudhary
दिवसभराच्या थकव्यातून रात्री पायांना आराम हवा असतो. अशावेळी रात्रीच्या वेळी तुम्ही पायांना मालिश करणे महत्वाचे आहे.
तळपायाला खोबरेल तेलाने मालिश केल्याने पायांना शांत वाटते.
पायांची मालिश केल्याने पाय मऊ होतात व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
पायाला खोबरेल तेल लावल्याने त्वचा कोरडी होत नाही. खोबरेल तेल ओलावा टिकून ठेवते.
रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला मालिश केल्याने टाचा दुखत नाही.
खोबरेल तेलाने पायांची मालिश केल्याने त्वचेला भेगा पडत नाही तसेच कोणत्या जखमा होत नाही. पायांना खोबरेल तेल लावल्याने त्वचेची लवचिकता राहते व पाय मऊ होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.