Shreya Maskar
गणेश चतुर्थीला खास गणपतीला नैवेद्यासाठी ओल्या नारळाचे मोदक बनवा.
ओल्या नारळाचे मोदक बनवण्यासाठी खोबरं, ड्रायफ्रूट, दूध, साखर, मिल्क पावडर, तूप, वेलची पावडर आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
मोदक बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या.
पॅन गरम करून त्यात तूप टाकून खोबरे खरपूस भाजून घ्या.
त्यानंतर यात दूध, साखर, मिल्क पावडर घालून साहित्य एकजीव करा.
शेवटी यात वेलची पूड, केशर आणि ड्रायफ्रूट्सचे काप घालून मिक्स करा.
आता हे मिश्रण एकजीव करून मोदकाच्या साच्यात भरा.
अवघ्या १० ते १५ मिनिटांत खमंग ओल्या नारळाचे मोदक बनवून तयार होतील.