Coconut Oil : नारळपाणी प्यायल्यानंतर खोबरं फेकू नका! १० मिनिटांत बनवा घरगुती हेअर ऑइल, केस दिसतील घनदाट अन् चमकदार

Shreya Maskar

हिरवा नारळ

नारळपाणी प्यायल्यानंतर उरलेला नारळ फेकून न देता, त्यापासून शुद्ध तेल बनवता येईल. हे तेल नियमित लावल्यास केस घनदाट आणि चमकदार होतील.

Green coconut | pinterest

ओलं खोबरं

ओल्या नारळाचे तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम नारळाचा गर लहान तुकड्यांमध्ये कापा. त्यात थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये चांगले वाटून पातळ पेस्ट बनवा.

Wet coconut | pinterest

नारळाचे दूध काढा

वाटलेला नारळ एका स्वच्छ कापडात ठेवून चांगला पिळून घ्या. काढलेले नारळाचे दूध एका वेगळ्या भांड्यात गोळा करा.

Remove the coconut milk | pinterest

दूध शिजवा

आता नारळाचे दूध एका पातेल्यात ओता आणि मंद आचेवर शिजवा. मिश्रण तळाला चिकटू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा. दुधातील पाणी हळूहळू आटून जाईल. त्यानंतर नारळाच्या जाड भागापासून तेल वेगळे होईल. तेल पूर्णपणे वेगळे झाल्यावर गॅस बंद करा.

Cook the milk | pinterest

गाळून साठवा

प्रथम तेल थंड होऊ द्या. यानंतर ते एका स्वच्छ कापडातून किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्या. तयार केलेले तेल एका स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या काचेच्या बाटलीत साठवा.

Filter and store | pinterest

तेल लावण्याची पद्धत

तेल जास्त प्रमाणात वापरण्याची गरज नाही. थोडेसे तेल टाळूवर आणि केसांच्या मुळांवर लावा आणि बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मालिश करा. ते केसांवर सुमारे ३० ते ६० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

Method of oiling | pinterest

नारळाच्या तेलाचे फायदे

नारळाचे तेल केस मऊ करण्यास आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. त्याच्या वापरामुळे केसांना कंडिशनिंग मिळते, ज्यामुळे केस रेशमी बनतात.

Benefits of coconut oil | pinterest

वापरण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

हे तेल पहिल्यांदा लावण्यापूर्वी, त्वचेच्या लहान भागावर थोडेसे तेल लावून संवेदनशीलतेची टेस्ट करा. जळजळ किंवा त्रास जाणवल्यास, त्याचा वापर थांबवा.

Keep this in mind before use | pinterest

NEXT : मध्यरात्री ३ वाजता अचानक दचकून जाग येते? यामागे असू शकतं 'हे' गंभीर कारण, वेळीच ओळखा

Sleeping | AI PHOTO
येथे क्लिक करा...