Shreya Maskar
चहासोबत खायला घरीच स्वादिष्ट कोकोनट कुकीज बनवा.
कोकोनट कुकीज बनवण्यासाठी बटर, सुके खोबरे, बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स, पिठीसाखर, मैदा, दूध इत्यादी साहित्य लागते.
कोकोनट कुकीज बनवण्यासाठी सर्वप्रथम बटर वितळवून एका भांड्यात घ्या.
बटरमध्ये पिठीसाखर घालून छान एकजीव करून घट्टसर मिश्रण बनवा.
आता एका भांड्यात मैदा घाला आणि त्यात सुके खोबरे, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स घालून छान मिक्स करून घ्या.
हे मिश्रण छान मिक्स करून त्यात गरजेनुसार दूध घाला.
या पिठाचे छोटे गोळे करून पिठीसाखरच्या मिश्रणात घोळवून हलक्या हाताने कोट करा.
बेकिंग ट्रेवर बटर पेपरवर पसरवून कुकीज १५ ते २० मिनिटे ओव्हनमध्ये बेक करायला ठेवा.
अशाप्रकारे स्वादिष्ट कोकोनट कुकीज तयार झाले. हे कुकीज दीर्घकाळ ठेवण्यासाठी हवाबंद डब्याचा वापर करा.