Shreya Maskar
नारळाची बर्फी बनवण्यासाठी ओले खोबरे, खवा, तूप, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स आणि दूध इत्यादी साहित्य लागते.
नारळाची बर्फी बनवण्यासाठी गरम पाण्यात साखर घालून साखरेचा पाक तयार करून घ्या.
आता यात ओले खोबरे घालून छान मिक्स करून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये तूप, खवा आणि थोडे दूध घालून चांगले एकजीव करून घ्या.
मिश्रणात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
शेवटी मिश्रणात वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा.
एका ताटाला तूप लावून मिश्रण चांगले पसरवून घ्या.
१ तासांसाठी बर्फी फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.