Siddhi Hande
प्रत्येकाच्या घरात सणासुदीला काही न काही गोड पदार्थ बनतो. त्यात ओल्या नारळाची बर्फी ही सर्वांनाच आवडते.
ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी कढईत तूप गरम करा. त्यात खोबरे छान परतून घ्या.
खोबरं थोडं परतून झाल्यावर त्यात साखर आणि दूध टाका. आणि सतत हलवत राहा.
हे मिश्रण घट्ट होईपर्यंत तुम्हाला चमच्याने सतत ढवळत राहायचे आहे.
यानंतर त्यात वेलची पूड टाका. हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करा
एका ताटाला तूप लावून घ्या. त्यावर हे मिश्रण टाकून छान थापून घ्या.
त्यानंतर वरुन बदाम, पिस्ताचे काप टाका. त्यानंतर या बर्फीच्या वड्या पाडा.