Manasvi Choudhary
उन्हाळ्यात घरामध्ये झुरळांचा सुळसुळाट असतो. किचनमधील झुरळांमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.
झुरळांना पळवून लावण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र तुम्हाला माहितीये का? नैसर्गिकरित्या झुरळाचे आयुष्य किती असते.Cockroach Life
झुरळाचे आयुष्य हे त्यांच्या वातावरणीय बदल आणि प्रजातीवर अवलंबून असते.
झुरळ हे साधारणपणे १०० दिवसांपासून ते १ ते २ वर्ष जगतात.
जर्मन झुरळे ही आकाराने लहान असतात. स्वयंपाकघरातील झुरळे ही काहीशी जर्मन झुरळे असतात. ज्यांचे आयुष्य १०० ते २०० दिवस असते.
अमेरिकन झुरळे ही लालसर तपकिरी रंगाची आणि मोठी झुरळे असतात. या झुरळाचे आयुष्य १ ते २ वर्षे असतात.
मादी झुरळ एका कोशात अंडी घालते. या कोशातून २८ ते ४० दिवसांत पिल्ले बाहेर येतात.
अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असतात. झुरळ जसजशी मोठी होतात तसा त्यांचा रंग बदलतो
तुम्हाला माहितीये का? झुरळ अन्न न खाता १ महिना जिवंत राहू शकते.