Surabhi Jayashree Jagdish
यकृत हा शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अवयव आहे. अन्नाचं पचन, पोषक घटकांचं साठवण, विषारी पदार्थांचं विघटन आणि चयापचय यांसारखी महत्त्वाची कामं यकृत करत असतं.
जास्त तेलकट, साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचं सेवन केल्याने यकृतावर चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. यामुळे 'फॅटी लिव्हर'ची समस्या निर्माण होऊन यकृताची खराब होण्याचा धोका वाढतो.
सफरचंदामध्ये 'पेक्टिन' नावाचं फायबर असल्याने पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत होते. फायबरचा अधिक लाभ मिळवण्यासाठी सफरचंद सालीसकट खाण्याची शिफारस केली जाते. किवीमध्येही भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते पचन सुधारण्यास आणि यकृताच्या आरोग्याला आधार देण्यास उपयुक्त ठरू शकते.
रास्पबेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे त्या पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. ब्ल्यूबेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करतात.
नाशपातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असून ते पौष्टिक फळ आहे. अधिक तंतुमय घटक मिळावेत यासाठी ते सालीसकट खाणं योग्य मानलं जातं. नियमित आणि संतुलित प्रमाणात नाशपातीचं सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते.
ॲव्होकॅडोमध्ये फायबरसोबतच आरोग्यदायी असंतृप्त स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. हे फळ संतुलित आहाराचा भाग म्हणून हृदय आणि चयापचयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त मानलं जातं. योग्य प्रमाणात सेवन केल्यास लिव्हरच्या आरोग्याला फायदा होतो.
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जी शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायक मानली जातात. फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तींना डाबिंळ खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामुळे या रूग्णांना आहारात डाळिंबाचं सेवन केलं पाहिजे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.