Saam Tv
तांबे-पितळेची भांडी चमकतील मिनिटांत
पूजेची भांडी आणि मूर्ती काळवंडल्या आहेत? बाजारातून महागडी पीतांबरी आणण्याऐवजी घरातच बनवा सोपा फॉर्म्युला.
१/४ कप मीठ, १/४ कप सिट्रिक ॲसिड पावडर , १/४ कप गव्हाचे पीठ, १/४ कप वॉशिंग पावडर
एका कोरड्या भांड्यात मीठ, सिट्रिक ॲसिड, गव्हाचे पीठ आणि डिटर्जंट एकत्र करून व्यवस्थित मिसळा.
आधी भांडी साध्या पाण्याने आणि हलक्या साबानाने धुवून घ्या. त्यानंतर हे घरगुती मिश्रण लावून हलक्या हाताने घासून स्वच्छ करा.
बारीक नक्षीकाम असलेल्या मूर्ती किंवा दिव्यांवर जमलेली धुळ-घाण काढण्यासाठी मऊ टूथब्रशचा वापर करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून वाळवा.
तांब्याची भांडी धुतल्यानंतर लगेचच सुती कपड्याने कोरडी पुसून घ्या. पाण्याचे थेंब राहिल्यास त्यावर पुन्हा हिरवे/काळे डाग पडतात.
सिट्रिक ॲसिड ॲसिडिक असल्याने हे मिश्रण भांड्यांवर जास्त वेळ लावून ठेवू नका. सोन्याचा मुलामा किंवा चांदीच्या भांड्यांवर हे वापरणे टाळा.
हे घरगुती पीतांबरी मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा. लहान मुले, पाळीव प्राणी आणि खाण्याच्या पदार्थांपासून हे नेहमी दूर ठेवा.
NEXT : सावधान! जास्त चहा-कॉफी पिताय? तुमची किडनी होतेय खराब; रिपोर्टमधील धक्कादायक खुलासे