Siddhi Hande
ख्रिसमसला अवघे काही दिवस उरले आहे. ख्रिसमसला केक दिला जातो. तुम्ही यावेळी रवा केक ट्राय करा.
रवा केक बनवण्यासाठी बारीक रवा, साखर, दही, दूध, मिल्क पावडर, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा आणि मीठ आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्हाला एका भांड्यात रवा आणि साखर घ्यायची आहे.
त्यात दही, दूध, मिल्क पावडर, बेकिंग पावडर आणि सोडा टाकायचा आहे. यात मीठ टाकून मिश्रण छान मिक्स करा.
हे मिश्रण २० मिनिटे बाजूला ठेवा.
यानंतर कुकरमध्ये मीठ किंवा वाळू पसरवून त्यावर एक स्टँड ठेवा.
यानंतर केकच्या डब्याला तेल लावून घ्या. त्यात केकचे मिश्रण टाका.
यानंतर कुकरची शिट्टी काढून झाकण लावा. यानंतर ३०-४० मिनिटे बेक करा.
यानंतर टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने केक चिकटला तर नाही ना हे चेक करा.
यानंतर केक थंड झाल्यावर बाहेर काढा. त्याचे स्लाइस कट करुन सर्व्ह करा.