Shruti Vilas Kadam
ख्रिसमस पार्टीला ग्लॅमरस आणि शिमरी लूक हवा असेल तर सिक्विन ड्रेस सर्वोत्तम. लाइट्समध्ये चमकणारा हा लूक तुम्हाला स्टेजसारखे फील देतो.
हिवाळ्यात व्हेलवेटचा लाल गाऊन रॉयल, एलिगंट आणि उबदार लूक देतो. ख्रिसमसच्या थीमला अगदी परफेक्ट बसणारा हा पर्याय आहे.
स्मूथ आणि शायनी टेक्सचरमुळे साटन स्लिप ड्रेस खूपच मॉडर्न दिसतो. पार्टीसाठी हा स्टायलिश आणि मिनिमलिस्ट पर्याय आहे.
कम्फर्ट आणि स्टाईल यांचा छान मिलाफ हवा असेल तर ए-लाइन मिडी ड्रेस उत्तम. कोणत्याही बॉडी टाइपला सूट होणारा हा टाइमलेस पर्याय.
फिगर-हगिंग डिझाईनमुळे बॉडीकॉन ड्रेस पार्टीत बोल्ड आणि कॉन्फिडंट लूक देतो. हाय हिल्स आणि सटल ज्वेलरीसोबत हा लूक जबरदस्त दिसतो.
फ्लर्टी आणि फन लूक हवा असेल तर रफल्स असलेला शॉर्ट लाल ड्रेस परफेक्ट. ख्रिसमस पार्टीतील डान्स मूडसाठी हा उत्तम पर्याय.
लेसची नाजूक डिटेलिंग आणि लाल रंगाची सुंदरता दोघांचा संगम तुम्हाला सॉफ्ट, फेमिनिन आणि क्लासी लूक देतो. फोटोमध्येही खूप सुंदर दिसतो.