Shreya Maskar
ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिसमस पार्टीत तुम्हाला हटके आणि स्टायलिश लूक करायचा असेल तर खासफॅशन टिप्स जाणून घेऊयात.
ख्रिसमस पार्टीसाठी वेस्टन कपड्यांची निवड करा. तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे निवडा. आवडत असेल तर एखादा काळ्या रंगाचा शिमरी ड्रे, देखील भारी वाटेल.
ख्रिसमस हा सण थंडीत येतो त्यामुळे तुम्ही लोकरीचे वेस्टन कपडे परिधान करू शकता. उदा. जीन्स-टॉप, वनपीस, शॉर्ट ड्रेस, स्कर्ट
वेस्टर्न लूक मिनिमल ज्वेलरी घालून पूर्ण करा. तो जास्त आकर्षक दिसतो. तसेच लूकला शोभेल अशी मोठी ज्वेलरी घाला.
थंडीत चेहरा कोरडा पडतो. त्यामुळे मिनिमल आणि नॅचरल मेकअप लूक ठेवा. जास्त भडक मेकअप करू नका. नाहीतर ते लाल कपड्यासोबत चांगले वाटणार नाही.
बाहेर जाण्यापूर्वी शरीराला मॉइश्चरायझर लावा. डोळ्यांचा मेकअप विशेष खास करा. आयलायनर लावायला विसरू नका.
संपूर्ण लूकला मॅचिंग चप्पल परिधान करा. यात तुम्ही हाय हिल्स घालू शकता. तसेच आजकाल शूजचा ट्रेंड आहे. तसेच शूज घालून तुम्ही आरामात फिरू शकाल.
लूकला मॅचिंग बॅगची निवड करा. जास्त मोठी बॅगसोबत ठेवू नका. स्टायलिश बॅग घ्या. बाजारात अनेक प्रकारच्या ट्रेंडी बॅग उपलब्ध आहेत.