Surabhi Jayashree Jagdish
जगभरात दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. मात्र एक अशी जागा आहे जिथे फेब्रुवारीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यात येतो.
जगात एक गाव आहे जिथे 18 फेब्रुवारीला ख्रिसमस साजरा केला जातो.
कोलंबियातील क्विनामायो गावात ख्रिसमस डिसेंबरऐवजी 18 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्याचा संबंध लोकांच्या गुलामगिरीशी होता.
ही परंपरा क्विनामायोमध्ये आपल्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेली आहे. गुलामगिरीच्या काळात या ठिकाणच्या लोकांना २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करण्याची परवानगी नव्हती.
या ठिकाणच्या लोकांना ख्रिसमससाठी फेब्रुवारीची तारीख निवडण्यास सांगितली असता त्यांनी १८ फेब्रुवारीची निवड केली.
असं मानलं जातं की, स्त्रीला बाळाला जन्म दिल्यानंतर 45 दिवस उपवास करावा लागतो. म्हणून हा सण डिसेंबरऐवजी फेब्रुवारीमध्ये साजरा केला जातो.