Shreya Maskar
चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी मैदा, कोको पावडर, मीठ, बेकिंग पावडर, डार्क कंपाऊंड चॉकलेट, बटर, दही, व्हॅनिला इसेन्स आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
चॉकलेट ब्राउनी बेक करण्यासाठी कुकरमध्ये मीठ टाकून त्यात स्टँड ठेवा, जो बेकिंग ट्रे ठेवण्यासाठी वापरला जाईल.
ब्राउनी बनवण्यासाठी मैदा, कोको पावडर, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चाळणी घ्या.
आता डबल बॉयलरमध्ये चॉकलेट आणि बटर घालून वितळवा.
वितळलेल्या चॉकलेटमध्ये दही, व्हॅनिला इसेन्स आणि साखर घालून चांगले फेटून घ्या.
हे लिक्विड मिश्रण मैद्याच्या मिश्रणात टाकून नीट मिक्स करा.
हे मिश्रण ट्रेमध्ये बटर पेपर लावून त्यात सेट करून घ्या.
ब्राउनी कुकरमध्ये ४५-५० मिनिटे बेक करा आणि टूथपिक घालून शिजली का तपासा.
आता ब्राउनी थंड झाल्यावर चॉकलेट सॉस टाकून सर्व्ह करा.