Shreya Maskar
सध्या सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह आणि माहौल पाहायला मिळत आहे. भक्तजन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मुंबईत अनेक मोठ्या सार्वजनिक गणपतींचा मुख दर्शन सोहळा पार पडला आहे. यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ ला (सोमवारी) आली आहे. ११ दिवस गणपतीचा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो.
श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे चोर गणपती बसवण्याची परंपरा सुमारे १५० ते २०० वर्षे जुनी आहे.
गणेश चतुर्थीच्या दोन दिवस अगोदर चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो.
चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली जाते. विशेष म्हणजे या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते.
पहाटेपासून भक्त दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात. येथे पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो. या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते .
चोर गणपती नवसाला पावणारा गणपती आहे. यंदा तुम्ही देखील या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता. येथे शांत आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.