Chocolate Waffle Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी खाण्याची इच्छा आहे? झटपट घरच्या घरी बनवा चविष्ट चॉकलेट वॉफल

Shruti Vilas Kadam

साहित्य

मैदा, कोको पावडर, साखर, बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, दूध, अंडे (ऐच्छिक), वितळलेले बटर किंवा तेल, व्हॅनिला इसेन्स आणि चॉकलेट चिप्स घ्या.

Chocolate Waffle Recipe

कोरडे आणि ओले मिश्रण वेगवेगळे तयार करा

एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. दुसऱ्या भांड्यात दूध, अंडे, बटर आणि व्हॅनिला इसेन्स मिसळा.

Chocolate Waffle Recipe

बॅटर तयार करा

ओले मिश्रण कोरड्या मिश्रणात घालून हलक्या हाताने एकजीव करा. शेवटी चॉकलेट चिप्स घालून पुन्हा हलकेच मिसळा.

Chocolate Waffle Recipe

वॉफल मेकर गरम करा

वॉफल मेकरला थोडे बटर किंवा तेल लावून गरम करा. त्यात तयार बॅटर योग्य प्रमाणात ओता.

Chocolate Waffle Recipe

वॉफल शिजवा

झाकण बंद करून ४ ते ६ मिनिटे किंवा वॉफल बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होईपर्यंत शिजवा.

Chocolate Waffle Recipe

टॉपिंगने सजवा

तयार वॉफलवर वितळलेले चॉकलेट, चॉकलेट सिरप, व्हीप्ड क्रीम, ताजी स्ट्रॉबेरी, केळी किंवा आईस्क्रीम घालून आकर्षक सजावट करा.

Chocolate Waffle Recipe

Weight Loss Drink: वजन आणि पोटावरील चरबी कमी करायची आहे? मग रोज प्या 'हे' ५ हेल्दी ड्रिंक्स

Weight Loss Drink | Saam TV
येथे क्लिक करा