Chocolate Mousse Recipe: चॉकलेट प्रेमींसाठी खास घरच्या घरी करा क्रीमी स्वादिष्ट चॉकलेट मूस, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

डार्क किंवा मिल्क चॉकलेट, व्हिपिंग क्रीम, पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्स हे मुख्य साहित्य घ्या.

Dark Chocolate Mousse | pinterest

चॉकलेट वितळवा

चॉकलेटचे छोटे तुकडे करून डबल बॉयलर किंवा मायक्रोवेव्हमध्ये हळूहळू वितळवा. चॉकलेट जळणार नाही याची काळजी घ्या.

Chocolate Mousse Cake Recipe

क्रीम फेटून घ्या

थंड व्हिपिंग क्रीम एका भांड्यात घेऊन इलेक्ट्रिक बीटरने फेटा. क्रीम थोडी घट्ट आणि फ्लफी होईपर्यंत फेटणे महत्त्वाचे आहे.

Chocolate Mousse Cake Recipe

पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्स घाला

फेटलेल्या क्रीममध्ये चवीनुसार पिठीसाखर आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स घाला. मिश्रण हलक्या हाताने एकजीव करा.

Chocolate Mousse Cake Recipe

वितळलेले चॉकलेट मिसळा

वितळलेले चॉकलेट थोडे कोमट झाल्यावर क्रीममध्ये घाला. स्पॅटुलाच्या मदतीने हलक्या हाताने फोल्ड करा, जेणेकरून मूसचा फ्लफी टेक्स्चर टिकून राहील.

Chocolate Mousse Cake Recipe

मूस कपमध्ये सेट करा

तयार मिश्रण छोटे ग्लास किंवा सर्व्हिंग कपमध्ये भरा. कप काही तास फ्रिजमध्ये ठेवून मूस व्यवस्थित सेट होऊ द्या.

Chocolate Mousse Cake Recipe

सर्व्ह करा

सेट झाल्यानंतर वरून चॉकलेट शेव्हिंग्स, कोको पावडर, चॉकलेट चिप्स किंवा ताजी बेरी घालून सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

Chocolate Mousse Cake Recipe

Navratri Ethnic Looks: नवरात्रीत दिसायचंय हटके? ट्राय करा 'हे' ७ ट्रेंडी एथनिक लुक्स; गरबा-दांडियासाठी परफेक्ट

Navratri Ethnic Looks | Saam Tv
येथे क्लिक करा