Shreya Maskar
चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध, दूध पावडर, कॉर्नफ्लोअर, व्हॅनिला इसेंस, चॉकलेट इत्यादी साहित्य लागते.
चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध चांगले उकळवून घ्या.
उकळलेल्या दुधात साखर आणि दूध पावडर घालून एकत्र करा.
छोट्या कपमध्ये कॉर्नफ्लोअर पावडर घालून पेस्ट बनवा.
दुधात व्हॅनिला इसेंस घालून चांगले फेटून घ्या.
आता यात चॉकलेट टाकून छानविरघळून घ्या.
आईस्क्रीम मोल्डमध्ये दूधाचे मिश्रण टाकून त्यात आईस्क्रीम स्टिक टाका.
७ ते ८ तास आईस्क्रीम डीप फ्रिजरमध्ये सेट करून घ्या.