Shruti Vilas Kadam
चॉकलेट कोल्ड कॉफी बनवण्यासाठी २ कप थंड दूध, २ चमचे कॉफी पावडर, २ चमचे चॉकलेट सिरप, २ ते ३ चमचे साखर, २ स्कूप चॉकलेट किंवा व्हॅनिला आईस्क्रीम आणि ५ ते ६ बर्फाचे तुकडे घ्या.
एका छोट्या वाटीत कॉफी पावडर घ्या. त्यात २ चमचे गरम पाणी घालून कॉफी पूर्णपणे विरघळवून घ्या. यामुळे कॉफीचा स्वाद दुधात व्यवस्थित मिसळतो आणि कॉफी छान सुगंध येतो.
मिक्सरच्या भांड्यात थंड दूध, तयार कॉफीचे मिश्रण, साखर, चॉकलेट सिरप आणि बर्फाचे तुकडे घाला. त्यानंतर सर्व साहित्य एकत्र करून साधारण ३० ते ४५ सेकंद ब्लेंड करा. मिश्रण फेसाळ आणि एकसारखे झाले की मिक्सर बंद करा.
चॉकलेट कोल्ड कॉफी अधिक क्रीमी बनवण्यासाठी ब्लेंड करताना एक किंवा दोन स्कूप आईस्क्रीम घाला. यामुळे कॉफीला घट्टपणा आणि चॉकलेटचा छान स्वाद मिळतो.
सर्व्ह करण्यापूर्वी ग्लासच्या आतील बाजूने चॉकलेट सिरप स्प्रे करा. त्यानंतर तयार केलेली कोल्ड कॉफी ग्लासमध्ये ओता. यामुळे कॉफी दिसायला कॅफेसारखी वाटते.
कॉफीच्या वर थोडे चॉकलेट सिरप, किसलेले चॉकलेट किंवा चॉकलेट शेव्हिंग्स घाला. आवडत असल्यास थोडी व्हीप्ड क्रीमही वापरू शकता.
चॉकलेट कोल्ड कॉफी तयार झाल्यानंतर लगेच सर्व्ह करा. अधिक गोड चव आवडत असल्यास चॉकलेट सिरप वाढवा; साखर कमी हवी असल्यास तिचे प्रमाण कमी ठेवा.