Chocolate Balls Recipe: पार्टी किंवा फंक्शनसाठी घरी बनवा चविष्ट आणि मऊसर चॉकलेट बॉल्स, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

१ कप बिस्किटांचा चुरा, २ चमचे कोको पावडर, २ चमचे पिठीसाखर, ३ ते ४ चमचे दूध, अर्धा कप डार्क किंवा मिल्क चॉकलेट, चॉकलेट चिप्स किंवा ड्रायफ्रूट्सबिस्किटांचा चुरा करा

Chocolate balls Recipe

कोको पावडर घाला

सर्वप्रथम चॉकलेट किंवा साधी बिस्किटं मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचा चुरा तयार करा. आता बिस्किटांच्या चुऱ्यामध्ये २ चमचे कोको पावडर आणि थोडी पिठीसाखर घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

Chocolate balls Recipe

दूध घालून मिश्रण तयार करा

आता या मिश्रणात थोडं थोडं दूध घाला. सर्व साहित्य एकत्र करून मऊसर गोळा तयार करा.

Chocolate balls Recipe

छोटे गोळे बनवा

तयार मिश्रणाचे छोटे छोटे भाग करा. हाताच्या मदतीने त्यांना गोल आकार द्या.

Chocolate balls Recipe

चॉकलेट वितळवून घ्या

एका भांड्यात डार्क किंवा मिल्क चॉकलेटचे तुकडे घ्या. ते डबल बॉयलर पद्धतीने किंवा मायक्रोवेव्हमध्ये वितळवून घ्या.

Chocolate balls Recipe

चॉकलेटचे कोटिंग करा

आता तयार केलेले बॉल्स वितळलेल्या चॉकलेटमध्ये बुडवा. त्यावर चॉकलेट चिप्स किंवा ड्रायफ्रूट्सचे तुकडे घाला.

Chocolate balls

फ्रिजमध्ये ठेवा

तयार चॉकलेट बॉल्स बटर पेपरवर ठेवा. त्यानंतर २० ते ३० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. चॉकलेट सेट झाल्यानंतर थंडगार सर्व्ह करा.

Chocolate balls

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Meditation Tips | SaamTv
येथे क्लिक करा