Siddhi Hande
रोज नाश्त्याला काय बनवायचा असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तुम्ही नाश्त्याला चटपटीत चिप्स भेळ बनवू शकतात.
वेफर्स भेळ बनवण्यासाठी फक्त ५ मिनिटे पुरेशी आहेत.
सर्वात आधी तुम्हाला वेफर्स घ्यायचे आहेत. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे वेफर्स घ्या.
त्यानंतर एका बाजूला कांदा, टॉमेटो आणि मिरची, कैरी एकदम बारीक चिरुन घ्या.
यानंतर एका भांड्यात सर्व चिप्स एकत्र करायचे आहे. ते चिप्स बारीक करा.
यानंतर त्यात कांदा, टॉमेटो टाकून मिक्स करा.
वरुन चाट मसाला, चिलिफ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकून मस्त मिक्स करा. वरुन मस्त लिंबू पिळून टाका.