Shreya Maskar
चायनिज समोसा बनवण्यासाठी कांदा, शिमला मिरची, कोबी, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, मीठ, काळी मिरी पावडर, तेल, मैदा आणि ओवा इत्यादी साहित्य लागते.
चायनिज समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात तूप, मीठ आणि ओवा घालून पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्या.
चायनिज समोसा सारण तयार करण्यासाठी सर्व भाज्या कापून पॅनमध्ये तेलात परतून घ्या.
आता यात कापलेला कांदा, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मीठ, काळी मिरी, सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप घालून मिक्स करा.
मिश्रण थंड झाल्यावर मैदाच्या पिठाचा गोळा लाटून त्यात सारण भरा.
आता पारीला समोसा आकार (त्रिकोणी) द्या.
गरम तेलात चायनिज समोसा तळून घ्या.
चायनिज समोसा तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.