Shruti Vilas Kadam
एका भांड्यात पाणी उकळून त्यात नुडल्स घाला. नुडल्स मऊ झाल्यावर पाणी काढून थंड पाण्याने धुवून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि लाल मिरचीचे फ्लेक्स घाला. लसूण सोनेरी होईपर्यंत परता.
त्यात कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कोबीसारख्या आवडीच्या भाज्या घालून मोठ्या आचेवर परतून घ्या.
सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि थोडे व्हिनेगर घालून सर्व साहित्य चांगले मिसळा.
तयार सॉसमध्ये उकडलेले नुडल्स घालून मोठ्या आचेवर २-३ मिनिटे व्यवस्थित टॉस करा.
त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. सोया सॉसमध्ये मीठ असल्याने मीठ प्रमाणातच वापरा.
तयार चिली गार्लिक नुडल्सवर स्प्रिंग अनियन आणि थोडे चिली फ्लेक्स घालून गरमागरम सर्व्ह करा.