Shruti Vilas Kadam
घाम, लघवीतून शरीरातील पाणी कमी होत असते. थंड पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक पाणी मिळते. डिहायड्रेशन टाळण्यास मदत होते.
उन्हात फिरल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.
व्यायाम करताना घाम येतो आणि शरीरातील पाणी कमी होते. अशा वेळी थंड पाणी प्यायल्याने शरीराला द्रवपदार्थ मिळतात आणि उष्ण वातावरणात शरीर थंडावा मिळतो.
कोल्ड ड्रिंक्स किंवा साखरयुक्त ड्रिंक्सऐवजी साधे थंड पाणी प्यायल्यास साखरेची इच्छा कमी होते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास थकवा, डोकेदुखी जाणवते. पण, पुरेसे पाणी प्यायल्याने हे त्रास होत नाहीत.
पुरेसे पाणी प्यायल्याने पचनसंस्थेचे कार्य नीट सुरू राहते. तसेच, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
किडनीच्या मदतीने शरीरातील खराब पदार्थ लघवीतून बाहेर टाकले जातात. पुरेसे पाणी प्यायल्याने ही प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.