Walking Timing: सकाळी ७, दुपारी १२ की संध्याकाळी ७ वाजता...; कोणत्या वेळेला चालणं सर्वात बेस्ट?

Shruti Vilas Kadam

सकाळी ७ वाजता चालण्याचे फायदे

सकाळी चालल्याने दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. नियमित चालण्याची सवय लागते आणि शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. हवामान अनुकूल असल्यास सकाळी चालणे हा चांगला पर्याय आहे.

When to Walk

सकाळी चालणे हृदयासाठी फायदेशीर

सकाळी चालण्यामुळे शारीरिक हालचालींना सुरुवात होते. शरिराची सूस्ती दूर होते. नियमित चालल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

Walking

दुपारी १२ वाजता चालावे का?

दुपारी चालणेही फायदेशीर ठरू शकते. मात्र, कडक उन्हात चालणे टाळा आणि शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या.

MORNING WALK BENEFITS | PINTREST

संध्याकाळी ७ वाजता चालण्याचे फायदे

सकाळी वेळ मिळत नसल्यास संध्याकाळी चालणे हा चांगला पर्याय आहे. यामुळे दिवसभरातील शारीराचा थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच नियमित व्यायामाची सवय टिकवण्यास मदत होते.

Need to walk | pinterest

किती वेगाने चालावे?

चालताना शरीराला झेपेल असा वेग ठेवा. सुरुवात हळू करावी लगेच दम लागेल असे चालू नयेत. चालताना श्वास थोडा वाढतो, पण बोलता येईल एवढा वेग असावा.

health benefits of walking | PINTREST

दररोज किती वेळ चालणे आवश्यक आहे?

१८ वयापुढील तरुणांनी आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम किंवा चालणे महत्वाचे आहे. यासाठी दिवसातून ३० मिनिटे, आठवड्यातील पाच दिवस चाललावे २ दिवस शरिराला आराम दिला तरी चालेल.

Walking | canva

चालण्याची योग्य वेळ कशी निवडावी?

चालण्यासाठी तुमच्या सोयीनुसार सकाळ दुपार संध्याकाळ अशी योग्य वेळ निवडा.पण त्यावेळेचे नियमित पालन ठेवा. सातत्य ठेवल्यास वजन सहज कमी होऊ शकतं. पण, छातीत दुखणे किंवा खूप धाप लागल्यास वैद्यकीय मदत घ्या.

health benefits of walking

Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

Pooja Sawant | Saam Tv
येथे क्लिक करा