Tanvi Pol
मूगाची खिचडी ही हलकी आणि पचायला सोपी शिवाय पौष्टिक असते. त्यामुळे लहान मुलांच्या आहारत त्यांना द्यावी.
दहीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात, त्यातील एक म्हणजे प्रोबायोटिक्समुळे पचन सुधारते शिवाय पोट भरलेले राहते.
केळं, सफरचंद, पपई यांचे स्मूदी पोषणदायी असतात, असे पेय लहान मुलं आवडीने पितात.
अनेकदा लहान मुलांच्या आहारात तूप लावलेली चपाची द्यावी. त्यामुळे लहान मुलांना ताकद मिळते.
हलके आणि स्निग्ध अन्न म्हणून हे पदार्थ फायदेशीर ठरतात.
पालकमध्ये लोह आणि जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत मिळतो. त्यामुळे तुम्ही पालकांचे पराठे बनवू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.