Children safety: मुलं आई-बाबांपासून लपवतात 'या' गोष्टी, पालकांना माहितीच हव्यात

Surabhi Jayashree Jagdish

मुलं गोष्टी का लपवतात?

मुलं अनेकदा काही गोष्टी पालकांपासून लपवतात कारण त्यांना ओरडा बसेल या भीतीने. कधी कधी ते पालकांना काळजी होऊ नये म्हणून शांत राहतात. काही वेळा त्यांना परिस्थितीची गंभीरता स्वतःलाच समजत नाही. मात्र मुलं लपवत असलेल्या कोणत्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे ते पाहूयात.

parenting tips | saam tv

मांजर किंवा कुत्रा चावणं

मुलं खेळताना प्राण्यांशी संपर्कात येतात आणि कधी कधी त्यांना ओरखडा किंवा चावा लागू शकतो. ते याला किरकोळ जखम समजून लपवतात. मात्र अशा जखमांमुळे संसर्ग किंवा रेबीजसारखे धोके निर्माण होऊ शकतात.

child behavior | saam tv

अनोळखी व्यक्तीशी संपर्क

कधी कधी अनोळखी व्यक्ती मुलांशी बोलण्याचा किंवा त्यांना काही देण्याचा प्रयत्न करू शकते. मुले भीतीमुळे किंवा गोंधळामुळे ही गोष्ट लपवू शकतात. पण ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.

kids secrets | saam tv

खेळताना डोक्याला लागलेली इजा

खेळताना मुलं पडणं किंवा डोक्याला मार लागणे सामान्य असते. पण डोक्याला झालेली कोणतीही इजा गंभीर ठरू शकते हे मुले अनेकदा समजून घेत नाहीत. ते खेळ थांबेल या भीतीने ही गोष्ट लपवतात.

child health awareness | saam tv

बुलिंग

शाळेत किंवा इतर ठिकाणी काही मुलं इतरांना त्रास देतात किंवा धमकावतात. अशा गोष्टी मुलं लाजेमुळे किंवा भीतीमुळे सांगत नाहीत. सततचा मानसिक किंवा शारीरिक त्रास त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतो.

bullying awareness | saam tv

saam tvइंटरनेटवरील वाईट अनुभव

आज मुले मोबाईल आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कधी कधी त्यांना चुकीचे मेसेज, फोटो किंवा अनोळखी व्यक्तींचा संपर्क येऊ शकतो. शिक्षा होईल किंवा इंटरनेट बंद होईल या भीतीने ते हे लपवतात.

child protection | saam tv

पालकांकडून प्रोत्साहन

मुलांना कठोर शिक्षा नव्हे तर समजून घेणे आणि आधाराची गरज असते. पालकांची प्रतिक्रिया किती शांत आणि समजूतदार आहे यावर मुलांचा विश्वास ठरतो.

online safety | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart disease signs
येथे क्लिक करा